Friday, 7 July 2017


गांधी हत्येचे सात प्रयत्न
--
पहिला प्रयत्न - पुण्यात फेकलेला बॉम्ब

पाच हल्ल्यांबाबत कागदोपत्री पुरावा आहे आणि पुण्याच्या हिंदू महासभेचा पाचही हल्ल्यात संबंध होता.

२५ जून १९३४ रोजी गांधी हरिजन यात्रेत भाग घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी नगरपालिका भवनात भाषण केले. गाडीने जात असता काही लोकांनी गाडीवर बॉम्ब फेकला, त्यांचा अंदाज चुकला आणि पुढे असलेल्या अण्णासाहेब भोपटकरांच्या गाडीवर बॉम्ब फेकला गेला.. गांधीजी बचावले...

गांधीजी आणि त्यांच्या विचारांना सर्वात जास्त विरोध पुण्यातूनच झाला. लोकमान्य टिळकांमुळे पुण्याकडे आलेले देशाचे नेतृत्व गांधींनी हिरावून घेतले असे पुणेकरांना वाटते.

रानडे, फुले, टिळक, आगरकर, गोखले, शिंदे, कर्वे यांच्या सारख्या समाज सुधारकांचे, देशभक्तांचे वास्तव्य असलेल्या पुण्यातच चंदनाच्या जंगलात साप आढळावेत तसा साप निर्माण झाला.
आगाखान पैलेस, येरवडा जेल, डॉ दिनशॉ यांचा निसर्गोपचार आश्रम इथे गांधीजी राहिले होते आणि अनेक महत्वपूर्ण निर्णयही इथे घेतले होते.

गांधीजींच्या अस्पृश्यांबद्दलच्या कळवळ्यामुळे चिडलेल्या एका पुणेरी हिंदू अतिरेक्याने त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकला.
पोलिसांना हा अतिरेकी सापडला नाही.

गांधीजींच्या हत्येमुळेच हिंदू धर्माचं संरक्षण होऊ शकेल या नीच हिंदू राष्ट्रवादाचा जन्म पुण्यात झाला. नथुराम - नारायण आपटे टोळीचेच हे कृत्य असणार हे अनेक इतिहासकार म्हणतात.

हरिजनांच्या मंदिरप्रवेशासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करण्यासाठी गांधीजींनी मोहीम सुरू केल्यापासून सनातनी हिंदू चिडले होते. त्यांनी गांधींविरूध्द देशभर निदर्शने केली होती.

गांधी हत्येचे हेच मुख्य कारण होतं

--
दुसरा प्रयत्न - नथुरामचा गांधीजींवर पाचगणीत हल्ला

जुलै १९४४ मध्ये गांधीजी पाचगणीत असताना एके दिवशी पुण्याहून खास बस करून १८ ते २० माणसं आली आणि त्यांनी दिवसभर गांधीविरोधी निदर्शने केली. गांधीजींनी या गटाचा नेता नथुरामला चर्चेसाठी बोलावलं, न येता तो दिवसभर निदर्शने करीत राहिला.

संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी हातात कट्यार घेऊन हा माथेफिरू गांधीजींना मारण्यासाठी धावला, मणिशंकर पुरोहित आणि भिलारे गुरूजींनी त्याला अडवले, झटापट करून खाली पाडले आणि निशस्त्र केले.
नथुराम सोबत असलेले विष्णु करकरे, थत्ते, बडगे, गोपाळ गोडसे व इतर सर्वजण पळून गेले. चार वर्षानंतर गांधीहत्या कटात हे चारही जण सहभागी होते.

गांधीजींनी हल्लेखोराला मारहाण करू नका असं सांगितलं आणि उदारपणे त्याला सोडून द्यायला सांगितलं.
इथे पृथ्वीराज चौहान ने मोहम्मद घोरीला सोडून जी चुक केली होती तीच गांधीजींनी या माथेफीरूला सोडून केली.
आफ्रिकेत गांधीजींवर गोर्या लोकांचे जे हल्ले झाले, त्या सर्वांना गांधीजींनी असेच सोडून दिले होते. मीर आलम या पठाणाने केलेल्या हल्ल्यात खाली पडल्याने गांधीजींना दात गमवावे लागले. पुढे मीर आलम त्यांचा शिष्य झाला. पण पुण्यातील अहंकारी धर्मांध लोक शेवट पर्यंत आणि आजही काही लोक द्वेषच केला करत आहेत.

गांधीजींनी कधीही कुणावर कायदेशीर कारवाई केली नाही. ते म्हणायचे या लोकांना बहकावलं गेलंय म्हणून मी केस करणार नाही. पुढे बहूतांश सर्वांना पश्चाताप होऊन ते गांधीजींचे शिष्य बनले.

पण रानडे, फुले, टिळक, आगरकर, गोखले, शिंदे, कर्वे यांच्या सारख्या समाज सुधारकांचे, देशभक्तांचे वास्तव्य असलेल्या पुण्यातच जन्मलेल्या या माथेफीरूने महात्म्याची हत्या केली.
--

तिसरा प्रयत्न - सेवाग्राम

सप्टेंबर १९४४ मध्ये गांधीजी जीनांबरोबर बोलणी करण्याची तयारी करत होते. हिंदू महासभा आणि RSS चा त्यांना विरोध होता. नथुराम आणि थत्ते यांनी वाट्टेल ते करून बैठक होऊच द्यायची नाही असं ठरवलं.
९ सप्टेंबर १९४४ रोजी गांधीजींनी मुंबईत जीनांबरोबर बोलणी सुरू केली, आपल्या परीने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करून हटवादी जीनांचं मन वळवण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. १८ दिवसानंतरही यातून काही निष्पन्न झालं नाही.
बोलणी करण्यासाठी गांधीजीनी सेवाग्राम हून मुंबईला प्रवास केला. सेवाग्राम आश्रमाच्या दारासमोर नथुराम, थत्तेचा गट धरणे धरून होता.
हातात जांबिया घेऊन गांधीजींच्या दिशेने जाताना नथुरामला पकडलं, पोलिसांच्या हवाली केलं. गटातील बहूतांश लोक सशस्त्र होते. शस्त्र लपवून ठेवले होते.
नथुरामला अटक करणार्या अधिकार्याने त्याच्याकडून जांबिया काढून घेताना थट्टेने विचारलं "तुला हुतात्मा व्हायचंय का..? गांधीजींना थांबवायचं काम तुमचे नेते सावरकरांवर का नाही सोडत..?
नथुराम म्हणाला "सावरकरांनी गांधीजींशी बोलायचं ठरवलं तर तो गांधीजींचाच सन्मान होईल. सावरकरांना बोलण्याची वेळच येणार नाही. हा जमादारच गांधींसाठी पुरेसा आहे.."

या महाभागांचा फाळणीला पुर्ण पाठींबा होता, यांना देशात मुस्लिम, दलित कुणीही नको होते. सावरकर  हिंदू राजांना भारतात सामिल न होण्याचे सल्ले देत फिरत होते.
याच हिंदू महासभा व RSS मुळे काश्मिरचा राजा हरिसिंग भारतात सामिल होण्यास तयार नव्हता.. आणि पाकिस्तानला काश्मीर मध्ये घुसायला संधी मिळाली.

हजारो देशविरोधी कामं करून हे देशद्रोही आम्ही मिळवलेल्या देशात आम्हाला देशप्रेम शिकवतात..

--

चौथा प्रयत्न - पुण्याला जाणार्या गाडीवर हल्ला

२९ जून १९४६ च्या रात्री गांधींना घेऊन जाणार्या गांधी स्पेशल गाडीला घातपात करण्यासाठी नेरळ आणि कर्जत दरम्यान रूळावर मोठे दगड रचून ठेवले होते, गाड़ी दगडांवर धडकली पण ड्रायव्हर सावध होता, त्याने ब्रेक दाबले व धक्का बसण्यापुर्वी गाडीचा वेग कमी झाला. त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.
इंजिनाची चाके व एक्सेल यांचं बरंच नुकसान झालं. दुसरं इंजीन पाठवून "गांधी स्पेशल" गाडी पुण्याला नेण्यात आली.
त्या दिवशी "गांधी स्पेशल" गाडीशिवाय नेहमीची दुसरी कोणतीच गाड़ी त्या मार्गावर नव्हती.

३० जूनला प्रार्थना सभेच्या वेळी बोलताना गांधीजी पुण्यात म्हणाले परमेश्वर कृपेने मी मृत्युच्या जबड्यातून सात वेळा वाचलो. मी कुणाचं कधी नुकसान केलं नाही किंवा मी कोणाला माझा शत्रू समजत नाही. माझ्यावर इतके हल्ले का व्हावेत, हे मला समजत नाही. कालचा माझ्यावरचा हल्ला फसला. मी इतक्यात मरणार नाही. मला १२५ वर्ष जगायचं आहे.

यावर नथुरामने कुचेष्टेनं म्हटलं पण तुम्हाला इतके दिवस जगू कोण देईल प्रार्थनासभेच्या वेळी हजर असणार्या काहीजणांनी हे शब्द ऐकल्याचं सांगितलं.
याचा उल्लेख नथुरामने अग्रणी या त्याच्या अंकात सुध्दा केला होता..

आता प्रश्न असा आहे की, पाकिस्तान निर्मितीच्या वाटाघाटी चालू होत्या, विभाजन झाले नव्हते, ५५ कोटी तर फारच दूर..
मग हे भुक्कड हिंदूत्ववादी गांधीजींना मारण्यासाठी का उतावीळ होते..?
यांचा गुरू सावरकर लपून हे सर्व का करवून घेत होता..?
अस्पृश्यता निवारणाला विरोध हेच एकमेव प्रमुख कारण दिसते.. कारण बंगाल, सिंध, पंजाब प्रांतात हिंदू महासभा व मुस्लिम लीगची युती होती आणि युतीमध्ये राहून विरोध होत नसतो.

नौखाली मध्ये हिंदू मुस्लिम दंगल चालू होती तेंव्हा हिंदू महासभा तिथे मुस्लिम लीग सोबत सत्तेत होती. त्यांनी दंगल थांबवायचा काहीही प्रयत्न केला नाही. गांधीजीनी एकट्याने प्रयत्न करून दंगली थांबवल्या.

आख्ख्या हिंदू समाजाला खोटी मनोगते (ज्वलंत विचार) सांगून मस्त मुर्खात काढलं देशद्रोही गुरू शिष्यांनी..
--

सहावा प्रयत्न - प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट

२० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसमधील प्रार्थनासभेच्या वेळी, मदनलाल पाहवा या पंजाबी निर्वासित माथेफीरूने एका गावठी बॉम्बचा स्फोट केला.
अटक झाल्यावर गांधीहत्येच्या कटात आपण सहभागी असल्याचे मदनलाल ने मान्य केले. या टोळीचे नेते पुण्यातले होते, त्यातील एकजण हिंदू राष्ट्र आणि अग्रणी चा संपादक व प्रकाशक होता, हेही त्याने सांगितले. ही नियतकालिके आपटे आणि नथुराम मराठीतून छापत व प्रसिद्ध करत असत.

टोळीतले सदस्य दिल्लीत ज्या मरिना हॉटेलमध्ये राहत होते, तिथल्या खोली नंबर ४० मध्ये मदनलाल पोलिसांना घेऊन गेला. पोलिसांना खोलीमध्ये पडून राहीलेल्या धोब्याकडच्या कपड्यावर NVG (नथुराम विनायक गोडसे) ही आद्याक्षरे होती. तिथे दिल्ली हिंदू महासभेतर्फे अद्याप प्रसिद्ध न झालेल्या एका वृत्तनिवेदनाची प्रतसुध्दा होती.
मुंबईतील रूईया कॉलेजचे प्राध्यापक जे. सी. जैन यांनी तेंव्हाचे मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांना माहिती दिली, की दिल्लीमध्ये गांधीजींची हत्या करण्याचा इरादा असलेल्या टोळीत आपण सहभागी असल्याची बढाई मदनलाल पाहवा या या तरूणाने आपल्याकडे मारली होती. देसाईंनी जैन यांच्या इशार्याकडे फारसे लक्ष दिले नाही; पण केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेल अहमदाबाद मध्ये त्यांना भेटल्यावर त्यांनी या घटनेचा ओझरता उल्लेख केला. पटेलांनी कटाबद्दल अशा प्रकारे कळल्याचे मान्य केले; पण जैन यांची कहाणी अतिरंजित वाटत असल्यामुळे त्यांनी पण तिकडे दुर्लक्ष केले.

मदनलाल ने कबूलीजबाबात म्हटलं होतं, की ही टोळी पुन्हा प्रयत्न करू शकेल इतक्या अतिरेकी विचारांची होती तो पुन्हा पुन्हा म्हणाला, वो फिर आयेगा.
पुणे आणि मुंबई पोलिसांना "हिंदू राष्ट्र", "अग्रणी" त्यांचे कर्मचारी व त्या पत्रांमागील लोकांची माहिती होती.
तरीही अक्षम्य ढिसाळपणा दाखवला गेला.
--                  

शेवटचा हल्ला - हे राम

शुक्रवार, ३०जानेवारी १९४८
२० जानेवारीच्या हल्ल्यानंतर पोलीस काय करत होते..?
सोयिस्करपणे त्यांनी या प्रकरणी कानाडोळा केला का..?
पुणे पोलिसांना कुणीच माहिती दिली नाही, मुंबई पोलीसमधील एका जेष्ठ अधिकार्याला हा अहवाल दिला गेला आणि मुंबईला थेट किंवा विमानाने जाण्याऐवजी, हा अधिकारी रेल्वेने वाटेत अलाहाबादला मुक्काम करीत सावकाश मुंबईला पोहोचला. तोवर नथुराम, आपटे, करकरे दिल्लीला निघाले होते.
२० ते ३० जानेवारी १९४८ या काळात पोलीसांनी केलेल्या उपाययोजनांमधून गांधीची हत्या टाळण्याऐवजी हल्लेखोरांचे काम सुलभ करण्याच्या दिशेनेच मुद्दाम प्रयत्न केले का, असे वाटू शकते. निष्काळजी पणा की RSS व हिंदू महासभेच्या सदस्य पोलीसांकडून केली गेलेली मदत.

संध्याकाळी प्रार्थनेला जात असताना तो माथेफिरू नथुराम "नमस्ते बापू" म्हणून पुढे आला, मनूला दूर ढकलून त्याने पिस्तूल काढून तीन गोळ्या गांधीजींवर झाडल्या..
या अत्यंत धार्मिक हिंदू माणसाने लहाणपनी रंभा या आपल्या दाईने शिकवलेल्या रामनामाचा जप चालूच ठेवला राम--राम--राम... हे राम

३० जानेवारी १९४८ सायंकाळी ५ वाजून १७ मिनिट, मोहनदास करमचंद गांधी म्हणून जन्मलेले अन् राष्ट्रपिता झालेले बापू, गांधीजी हे जग सोडून गेले.

बिर्लाच्या बंगल्यामधला रघू नावाचा माळी पिस्तूलधारी नथुरामकडे धावत गेला. त्याने हातातील कोयत्याच्या मुठीने नाथ्याच्या डोक्यावर मागून प्रहार केला आणि मागून त्याला घट्ट धरून ठेवले. संतप्त जमाव खुन्याला मारून टाकण्याच्या मनःस्थितित होता.
हा मियाँ दिसतोय, एका मुसलमानाने गांधीजींची हत्या केली..
कुणीतरी जोरात ओरडलं, गर्दीतल्या लोकांनी नारा सुरू केला मुसलमानाने बापूजींची हत्या केली. मारा मुसलमानांना.

नथुरामने आपले नाव व धर्म काहीच सांगितले नाही. लॉर्ड माउंटबेटन आत जात असताना त्यांनी हे नारे ऐकले. माउंटबेटन मागे वळून म्हणाला मुर्खांनो, मारेकरी हिंदू आहे.. त्याच्या सहाय्यकाने विचारले असं तुम्हाला का वाटतं, माउंटबेटन म्हणाले तो मुसलमान नसावा, अशी मी प्रार्थना करतो. गांधीजींना जर एका मुसलमानाने मारले असेल तर मी कल्पनाही करू शकत नाही इतका रक्तपात भारतात होईल..

पुण्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते अण्णासाहेब गाडगीळांनी नथुरामला ओळखलं आणि पुढील अनर्थ टळला.

आकाशवाणी वर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आज संध्याकाळी एका हिंदू ब्राम्हण व्यक्तीने गोळ्या झाडल्या त्यात त्यांचे निधन झाले... ही बातमी प्रसारीत झाली.

जगभरातील लोक दुःख व्यक्त करत असताना देशद्रोही_RSS व हिंदू महासभेच्या शाखांमध्ये रोषनाई केली गेली, फटाके वाजवले गेले. प्रत्यक्ष घटना घडण्यापुर्वीच पाच तास आधी गांधीजींच्या हत्येची बातमी सांगणारं एक पत्रक अलवारमध्ये वाटण्यात आलं..
देशद्रोही RSS व हिंदू महासभेच्या अनेक शाखांना या घटनेबाबत आधीच कल्पना देण्यात आली होती व त्यांनी आनंदोत्सवाची पुर्वतयारी केली होती.

केवळ धार्मिक अहंकारातून गांधीजींची हत्या केली गेली आणि आजतागायत लोकांना ५५ कोटी, फाळणी चे कारण सांगून मुर्ख बनवलं जातंय आणि लोक मूर्ख बनतात.

हत्येनंतर लोकांनी केलेल्या जाळपोळ व मारहानी मुळे या लोकांचा अहंकार ठेचला गेला, शेंडीला गाठ मारून या अपमानाचा सूड समाजात फूट पाडून, गांधीजींची, नेहरू काँग्रेसची बदनामी करून हेच लोक उगवत आहेत..

जागे व्हा, द्वेष पसरवणाऱ्या संघटनांना ओळखा


अजय मक्तेदार

No comments:

Post a Comment